प्रधानमंत्री येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाला देशाला संबोधित करणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाला देशाला संबोधित करणार आहेत. याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन तसंच इतर डिजिटल व्यासपीठांवर सकाळी साडेसहाला केलं जाईल.
प्रधानमंत्र्यांच्या भाषणानंतर ७ वाजता मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेद्वारा सर्वसाधारण नागरिकांसाठी दैनंदिन वापराच्या योगासनांचं प्रात्यक्षिकही होईल. त्यानंतर पावणे आठ वाजता योग विषयातल्या तज्ञांची मुलाखत प्रक्षेपित केली जाईल.
आयुष मंत्रालयातर्फे यावर्षी ‘घरामध्ये योग’ आणि ‘कुटुंबासोबत योग’ हा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आखला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.