पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ३० जूनपर्यंत मिळकत करात सवलत


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी सन २०२०-२०२१ मिळकत कर ३० जून २०२० पर्यंत रोख भरल्यास १० टक्के सवलत व ऑनलाइन करांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.


सदर योजना ३० जून २०२० पर्यंत लागू राहणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. महिला, माजी सैनिक व दिव्यांग नागरिकांना ५० टक्कांपर्यंत सवलत मिळणार आहे. या योजनेचा शहरातील मिळकत धारकांनी लाभ घ्यावा, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image