मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) श्री.बी.वेणूगोपाल; जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री.पराग जैन-नैनुटिया; परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे सचिव श्री.किशोरराजे निंबाळकर; अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन; मुंबई उपनगरासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा; गडचिरोली जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव आणि धुळे जिल्ह्यासाठी मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता वर्मा यांचा पालक सचिव म्हणून समावेश आहे.
या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक 202002281644501307 असा आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.