मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही समाजाच्या बांधवांना मदतीचे तातडीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आज केली. आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधानभवन मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री विधानभवनात आले होते, त्याप्रसंगी या दोन्ही समाजाच्यावतीने त्यांच्या समस्यांबाबत विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
#Lockdown मुळे नाभिक आणि परीट (धोबी) समाजातील बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट. दोन्ही समाजासाठी तातडीचे मदतीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा देण्याची विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस.
