मुंबई (वृत्तसंस्था) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना भेट दिली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. या ट्रस्टच्यावतीनं देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प, भाजीपाला गुणवत्ता प्रकल्प राबवले जातात. याशिवाय, शेतकरी व्यवसायाशी संबंधित प्रकल्पांची पाहणी दोन्ही नेत्यांनी केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.