योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर डीडी न्यूज वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर डीडी न्यूज वाहिनीवर उद्या संध्याकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तर गुरुवारपासून पुढचे १० दिवस दररोज सकाळी ८ वाजता डीडी भारती आणि डीडी स्पोर्ट्स या वाहिन्यांवर योगांसनांचे वर्ग आयोजित केले जाणार आहेत. योगगुरु स्वामी रामदेव, श्री श्री रविशंकर, सदगुरु जग्गी वासुदेव, भगिनी शिवानी यांच्यासारखे प्रसिद्ध मार्गदर्शक यावेळी योगासनांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.