प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
दुपारी ३ वाजता ही बैठक होईल. १६ जूनला २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ते चर्चा करतील. उर्वरित १५ मुख्यमंत्र्यांशी १७ जूनला संवाद साधणार असून त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमधून बाहेर पडणं या विषयांवर बैठकीत चर्चा होईल. देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबरची ही सहावी बैठक असेल. सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.